September 30, 2011

ब्राम्हणवादाच्या नावाने बोंबा मारणाऱ्या महाभागांसाठी





आज बरेच स्वयंघोषित बुद्धीजीवी (?) ब्राम्हणवादाचा खोटा देखावा उभा करत आहेत...त्यांनी खालील आक्षेपांचे खंडन करावे.
 १. लोकमान्य टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सुरु केली. बाजीराव पेशव्यांची नाही

 २. ब्राम्हण समाज कोणत्याच थोर व्यक्तीची जयंती एकत्र येऊन साजरी करत नाही. मग ते संत ज्ञानेश्वर असो, स्वा. सावरकर असो वा अन्य कोणी असो.
 ३. खरच ब्राम्हणवाद इतका प्रभावी असता तर मोगल किवा इंग्रज इतकी वर्ष राज्य करू शकले असते का???

 ४. सगळ्या पेशव्यांनी पेश्वीची वस्त्र छत्रपतीकडूनच आणली होती. पेशवाई स्वतः छत्रपतींनी दिली होती. पेशव्यांनी कधी छत्रपतीविरुद्ध बंड केले नाही. पेशव्यांचे बहुतांशी सरदार ब्राम्हणेतरच होते. विंचूरकर, होळकर, शिंदे इत्यादी.
 ५. भाजप म्हणजे ब्राम्हणांचा पक्ष असे समीकरण असेल, तर नास्तिकांचा कम्म्यूनिस्ट किवा कॉंग्रेसची सुरुवात पण ब्राम्हणानीच केली आहे.

 ६. ब्राम्हणवाद असता तर शिक्षण, नोकरी व निवडणूक या क्षेत्रांत आरक्षण लागू झाले असते का??
 ७. कोणतीही प्रभावी संघटना नाही, नेता नाही, निश्चित कार्यक्रम नाही तर मग ब्राम्हणवाद शक्य आहे का??

 ८. ब्राम्हणाकडे शास्त्र नाही, शेती नाही, लोकशाहीत आवश्यक संख्याबळ नाही, जवळ पास ८०% खेड्यातून ब्राम्हण हद्दपार झाला आहे. तर मग ब्राम्हणवाद शक्य तरी आहे का???
 ९. ब्राम्हणवाद असता तर विद्रोही उघडपणे संमेलने घेऊ शकले असते का?? ब्राम्हणवाद संपवण्याची भाषा करू शकले असते का??

 १०. ब्राम्हणवाद नाहीच कारण खूप क्षेत्रात ब्राम्हण फक्त नामधारी उरले आहेत.

 ११. नेहरू, डांगे हे फक्त जन्माने ब्राम्हण होते पण ते खरे ब्राम्हण विरोधी होते. ( ते तसे का होते हे उघड आहे, सत्तेसाठी वोट बँक गरजेची आहे. अल्पसंख्य ब्राम्हणांची कसली असेल वोट बँक???)
 १२. महाराष्ट्रात खरच ब्राम्हणवाद असता तर गेल्या ५-६ दशकात एकच ब्राम्हण मुख्यमंत्री कसा झाला? आज किती टक्के आमदार, जि. प. अध्यक्ष ब्राम्हण आहेत???

 १३. ज्याला ब्राम्हणवाद वाटत आहे त्याने ब्राम्हणांच्या जाती-संस्थेत जाऊन पाहावे. सगळ्यात मोठी बोंब हि आहे कि सभासदच येत नाहीत. कार्यक्रम काय तर म्हणे, वृद्धांचा सत्कार, पुस्तक पेढी, हळदी-कुंकू, सत्यनारायणाची पूजा, यातून काय ब्राम्हणवाद उभा राहणार आणि टिकणार????
 १४. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (R S S) म्हणजे ब्राम्हणवाद असे कोणी गैसाम्जातून म्हणत असेल तर आज अतिशय अल्प प्रमाणात ब्राम्हण संघ शाखेवर जातात. संघात ब्राम्हणांच प्राबल्य असेल पण संघाची विचारधारा ब्राम्हण्यावर नसून "राष्ट्राय स्वाहा इदं न मम " ह्या संकल्पनेवर आधारित आहे.
 १५. राम - कृष्ण, व्यास - वाल्मिकी, छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम, मनु ह्यापैकी कोणी ब्राम्हण नव्हते. यापैकी कोणालाही वजा केल्यास काय शिल्लक राहते?? शून्य ! - मग ब्राम्हणवाद कसा??

 १६. आज प्रत्येक समस्येसाठी ब्राम्हणवाद, मनुवादी यांना जबाबदार धरला जातं. ज्या देशात ब्राम्हण किवा मनु माहित नाही त्या देशात काहीच समस्या नाहीत?? भारतात ब्राम्हनांमुळे समस्या आणि उर्वरित जगात शतको न शतके सुख, शांती, समृद्धी, समानता आहे, असे चित्र दिसते का??? ज्यांना मनु/ब्राम्हण माहित नाही त्या आफ्रिकेत गृह युद्ध चालू आहेत. लाखो लोक मारत आहेत. साम्राज्यवाद, कळ्यांची, निग्रोंची गुलामगिरी, दोन महायुद्धांतील नरसंहार, मुस्लिमांनी केलेय कत्तली यापेक्षा मनूच्या अनुयायांनी काहीच पाप केले नाही. ब्राम्हणांनी क्षुद्राना किवा कोणाच्या कत्तली केल्याचे ऐकले आहे काय??
 १७. ब्राम्हणवाद असेल तर तो नाव बौद्धांमध्ये आहे. कसा?? मधल्या काळात अंधश्रद्धेपोटी अधःपतित ब्राम्हण, कोणत्या जातीत जन्म घेतला हे बघून (दलितांचा) द्वेष करत. आज केवळ एखादी व्यक्ती ब्राम्हण जातीत जन्माला आली म्हणून नवबौद्ध त्याचा तिरस्कार करायला सांगत आहेत. थोडक्यात जन्माधिष्ठित द्वेष.. म्हणजे आजचे नव्बुअद्ध मधल्या काळातील अधःपतीत ब्राम्हणांना follow करत आहेत.
 १८. ब्राम्हंवाद जर कुठे असेल तर तो दलितांमध्ये आहे. विशिष्ट दलित हेच ईतर मागास वर्गीयांमधील ब्राम्हण आहेत. सर्व सोयी, सवलती, राजकीय फायदे त्यांनाच मिळत आहेत. जि काही थोडी फार आर्थिक प्रगती झाली आहे ती फक्त त्यांचीच झाली आहे. अन्यथा दलितांनी सर्वाना बरोबर घेऊन प्रगती केली असती. दलितांना ब्राम्हणाशी बरोबरी करण्याची इतकी घाई झाली आहे कि इतर मागास वर्गीर्यांचा ते फक्त वापर करून घेत आहेत असे गेल्या ५० वर्षांच्या वाटचालींवरून दिसते आहे.( माझ्या मते हि गोष्ट त्यांना पण माहित आहे कि कि ते जरी आर्थिक दृष्ट्या सक्षम झाले तरी गुणवत्तेच्या बाबतीत ब्राम्हणांशी बरोबरी करू शकत नाहीत. मग काय जातीवर जाऊन ब्राम्हणांना लक्ष करणा हेच ते करू शकतात, आणि करत आले आहेत. - प्रसाद राऊत.
 १९. खरच ब्राम्हणवाद असता तर इतके खान सुपरस्टार झाले असते का?? अझरूद्दीन इतकी वर्ष कर्णधार राहिला असता का?? ए. पी. जे. अब्दुल कलम किवा मनमोहन सिंघ यांना सर्वोच्च पदावर जाता आले असते का???

 २०.महाराज मनुना ब्राम्हणवादि म्हणतात पण माणू हा एक क्षत्रिय राजा होता. आपल्या छोट्याश्या प्रदेशात त्यांनी एक आदर्श समाजव्यवस्था उभी केली. ती स्वीकार्य किवा योग्य वाटली म्हणून सर्व भारत भर पसरली. काळाच्या ओघात त्यात उच्च - नीचता व प्रक्षिप्त भाग टाकला गेला.
 २१. एका शिखाने इंदिरा गांधीची हत्या केली. एका तामिळीने राजीव गांधीची हत्या केली त्याबद्दल कोणी तामिळी किवा शीख यांना दोषी धरत नाही. पण एका ब्राम्हणाने महात्मा गांधींचा वाढ केला तर म्हणून संपूर्ण ब्राम्हण समाजाला टार्गेट का केल जात?? पन्नास वर्ष होऊन सुद्धा अजूनही त्या बाबतीत ब्राम्हनांवर ठपका ठेवला जातो (जेव्हा कि समस्त हिंदू जणांना गांधी वध हि काळाची गरज होती असं वाटत ), हा ब्राम्हण द्वेष नाही का??
 २२. ब्राम्हणांना उठता बसता शिव्या देणाऱ्या माणसांनी हा विचार करावा कि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात बहुसंख्य ब्राम्हण का होते??? का आता तुम्ही राजांपेक्षा जास्त हुशार आहात??

 २३. राजकीय, सामाजिक, अर्थीक, संशोधन, विज्ञान, उद्योग अथवा सरकारी क्षेत्रात ( कुठल्याही प्रकारचे आरक्षण नसताना ) ब्राम्हण यशस्वी का होतात?? हि त्यांची गुणवत्ता आहे,. ब्राम्हणवाद नाही.
 २४. वर्षभरातील दूरदर्शन, वर्तमानपत्र ह्यामधील बातम्या ब्वाच्ल्या असता गुन्हेगारी, बलात्कार, शोषण, दडपशाही, खून करणारे ब्राम्हण अत्यल्प प्रमाणात सापडतात. आणि इतर जेव्हा या गोष्टी करतात तेव्हा ब्राम्हणी कावा, ब्राम्हणी डाव, मनुवादी असं मुलामा देऊन त्या कृत्याला ब्राम्हनांशी जोडतात. लेखाची अथवा बातमीची गरज नसताना ब्राम्हणांना बदनाम केले जाते. यातून यांचे पुरोगामित्व सिद्ध होते काय??? ज्यांना कवील झाली आहे त्यांना सगळे पिवळेच दिसते. तशी कोणतीही घटना घडली कि यांना आधी ब्राम्हण दिसतो.
 या वरील सर्व गोष्टींवरून सिद्ध होते कि ब्राम्हणवाद नाहीच. ब्राम्हणवादाच्या नावाने आरडाओरडा करायचा आणि समाजाला दिश्हीन करायचे. 'हाथी चाले बाजार, कुत्ते भोके हजार' या म्हनिशिवाय यांना दुसरी कोणतीही म्हण लागू पडत नाही.
 आभार,
 श्री. विक्रम एडके.
 ( श्री. विक्रम एडके यांनी वाचण्यासाठी दिलेल्या एका पुस्तकातील वरील उतारा आहे.)

 

No comments:

Post a Comment