October 25, 2011

धनत्रयोदशी

 आश्विन वद्य त्रयोदशी (धनत्रयोदशी)
 यमदीपदान : प्राण हरण करण्याचे काम यमराजाकडे आहे. कालमृत्यू कोणालाच चुकला नाही आणि चुकविता येत नाही; पण अकाली मृत्यू कोणालाच येऊ नये याकरिता धनत्रयोदशीस यमधर्माच्या उद्देशाने कणकेचा तेलाचा दिवा (तेरा दिवे) करून तो घराच्या बाहेरच्या बाजूस दक्षिणेला तोंड करून सायंकाळी लावावा. एरव्ही दिव्याचे तोंड दक्षिणेस कधीही नसते. फक्त या दिवशी तेवढे दिव्याचे तोंड दक्षिणेस करून ठेवावे.
पुढील मंत्राने प्रार्थना करावी.
मृत्युना पाशदंडाभ्यां कालेन श्यामसह ।
     त्रयोदश्यांदिपदानात् सूर्यजः प्रीयतां मम ।।
     अर्थ : हे तेरा दिवे मी सूर्यपुत्राला अर्पण करतो. त्याने मृत्यूच्या पाशातून माझी सुटका करावी आणि माझे कल्याण करावे.

September 30, 2011

ब्राम्हणवादाच्या नावाने बोंबा मारणाऱ्या महाभागांसाठी





आज बरेच स्वयंघोषित बुद्धीजीवी (?) ब्राम्हणवादाचा खोटा देखावा उभा करत आहेत...त्यांनी खालील आक्षेपांचे खंडन करावे.
 १. लोकमान्य टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सुरु केली. बाजीराव पेशव्यांची नाही

 २. ब्राम्हण समाज कोणत्याच थोर व्यक्तीची जयंती एकत्र येऊन साजरी करत नाही. मग ते संत ज्ञानेश्वर असो, स्वा. सावरकर असो वा अन्य कोणी असो.
 ३. खरच ब्राम्हणवाद इतका प्रभावी असता तर मोगल किवा इंग्रज इतकी वर्ष राज्य करू शकले असते का???

 ४. सगळ्या पेशव्यांनी पेश्वीची वस्त्र छत्रपतीकडूनच आणली होती. पेशवाई स्वतः छत्रपतींनी दिली होती. पेशव्यांनी कधी छत्रपतीविरुद्ध बंड केले नाही. पेशव्यांचे बहुतांशी सरदार ब्राम्हणेतरच होते. विंचूरकर, होळकर, शिंदे इत्यादी.
 ५. भाजप म्हणजे ब्राम्हणांचा पक्ष असे समीकरण असेल, तर नास्तिकांचा कम्म्यूनिस्ट किवा कॉंग्रेसची सुरुवात पण ब्राम्हणानीच केली आहे.

 ६. ब्राम्हणवाद असता तर शिक्षण, नोकरी व निवडणूक या क्षेत्रांत आरक्षण लागू झाले असते का??
 ७. कोणतीही प्रभावी संघटना नाही, नेता नाही, निश्चित कार्यक्रम नाही तर मग ब्राम्हणवाद शक्य आहे का??

 ८. ब्राम्हणाकडे शास्त्र नाही, शेती नाही, लोकशाहीत आवश्यक संख्याबळ नाही, जवळ पास ८०% खेड्यातून ब्राम्हण हद्दपार झाला आहे. तर मग ब्राम्हणवाद शक्य तरी आहे का???
 ९. ब्राम्हणवाद असता तर विद्रोही उघडपणे संमेलने घेऊ शकले असते का?? ब्राम्हणवाद संपवण्याची भाषा करू शकले असते का??

 १०. ब्राम्हणवाद नाहीच कारण खूप क्षेत्रात ब्राम्हण फक्त नामधारी उरले आहेत.

 ११. नेहरू, डांगे हे फक्त जन्माने ब्राम्हण होते पण ते खरे ब्राम्हण विरोधी होते. ( ते तसे का होते हे उघड आहे, सत्तेसाठी वोट बँक गरजेची आहे. अल्पसंख्य ब्राम्हणांची कसली असेल वोट बँक???)
 १२. महाराष्ट्रात खरच ब्राम्हणवाद असता तर गेल्या ५-६ दशकात एकच ब्राम्हण मुख्यमंत्री कसा झाला? आज किती टक्के आमदार, जि. प. अध्यक्ष ब्राम्हण आहेत???

 १३. ज्याला ब्राम्हणवाद वाटत आहे त्याने ब्राम्हणांच्या जाती-संस्थेत जाऊन पाहावे. सगळ्यात मोठी बोंब हि आहे कि सभासदच येत नाहीत. कार्यक्रम काय तर म्हणे, वृद्धांचा सत्कार, पुस्तक पेढी, हळदी-कुंकू, सत्यनारायणाची पूजा, यातून काय ब्राम्हणवाद उभा राहणार आणि टिकणार????
 १४. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (R S S) म्हणजे ब्राम्हणवाद असे कोणी गैसाम्जातून म्हणत असेल तर आज अतिशय अल्प प्रमाणात ब्राम्हण संघ शाखेवर जातात. संघात ब्राम्हणांच प्राबल्य असेल पण संघाची विचारधारा ब्राम्हण्यावर नसून "राष्ट्राय स्वाहा इदं न मम " ह्या संकल्पनेवर आधारित आहे.
 १५. राम - कृष्ण, व्यास - वाल्मिकी, छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम, मनु ह्यापैकी कोणी ब्राम्हण नव्हते. यापैकी कोणालाही वजा केल्यास काय शिल्लक राहते?? शून्य ! - मग ब्राम्हणवाद कसा??

 १६. आज प्रत्येक समस्येसाठी ब्राम्हणवाद, मनुवादी यांना जबाबदार धरला जातं. ज्या देशात ब्राम्हण किवा मनु माहित नाही त्या देशात काहीच समस्या नाहीत?? भारतात ब्राम्हनांमुळे समस्या आणि उर्वरित जगात शतको न शतके सुख, शांती, समृद्धी, समानता आहे, असे चित्र दिसते का??? ज्यांना मनु/ब्राम्हण माहित नाही त्या आफ्रिकेत गृह युद्ध चालू आहेत. लाखो लोक मारत आहेत. साम्राज्यवाद, कळ्यांची, निग्रोंची गुलामगिरी, दोन महायुद्धांतील नरसंहार, मुस्लिमांनी केलेय कत्तली यापेक्षा मनूच्या अनुयायांनी काहीच पाप केले नाही. ब्राम्हणांनी क्षुद्राना किवा कोणाच्या कत्तली केल्याचे ऐकले आहे काय??
 १७. ब्राम्हणवाद असेल तर तो नाव बौद्धांमध्ये आहे. कसा?? मधल्या काळात अंधश्रद्धेपोटी अधःपतित ब्राम्हण, कोणत्या जातीत जन्म घेतला हे बघून (दलितांचा) द्वेष करत. आज केवळ एखादी व्यक्ती ब्राम्हण जातीत जन्माला आली म्हणून नवबौद्ध त्याचा तिरस्कार करायला सांगत आहेत. थोडक्यात जन्माधिष्ठित द्वेष.. म्हणजे आजचे नव्बुअद्ध मधल्या काळातील अधःपतीत ब्राम्हणांना follow करत आहेत.
 १८. ब्राम्हंवाद जर कुठे असेल तर तो दलितांमध्ये आहे. विशिष्ट दलित हेच ईतर मागास वर्गीयांमधील ब्राम्हण आहेत. सर्व सोयी, सवलती, राजकीय फायदे त्यांनाच मिळत आहेत. जि काही थोडी फार आर्थिक प्रगती झाली आहे ती फक्त त्यांचीच झाली आहे. अन्यथा दलितांनी सर्वाना बरोबर घेऊन प्रगती केली असती. दलितांना ब्राम्हणाशी बरोबरी करण्याची इतकी घाई झाली आहे कि इतर मागास वर्गीर्यांचा ते फक्त वापर करून घेत आहेत असे गेल्या ५० वर्षांच्या वाटचालींवरून दिसते आहे.( माझ्या मते हि गोष्ट त्यांना पण माहित आहे कि कि ते जरी आर्थिक दृष्ट्या सक्षम झाले तरी गुणवत्तेच्या बाबतीत ब्राम्हणांशी बरोबरी करू शकत नाहीत. मग काय जातीवर जाऊन ब्राम्हणांना लक्ष करणा हेच ते करू शकतात, आणि करत आले आहेत. - प्रसाद राऊत.
 १९. खरच ब्राम्हणवाद असता तर इतके खान सुपरस्टार झाले असते का?? अझरूद्दीन इतकी वर्ष कर्णधार राहिला असता का?? ए. पी. जे. अब्दुल कलम किवा मनमोहन सिंघ यांना सर्वोच्च पदावर जाता आले असते का???

 २०.महाराज मनुना ब्राम्हणवादि म्हणतात पण माणू हा एक क्षत्रिय राजा होता. आपल्या छोट्याश्या प्रदेशात त्यांनी एक आदर्श समाजव्यवस्था उभी केली. ती स्वीकार्य किवा योग्य वाटली म्हणून सर्व भारत भर पसरली. काळाच्या ओघात त्यात उच्च - नीचता व प्रक्षिप्त भाग टाकला गेला.
 २१. एका शिखाने इंदिरा गांधीची हत्या केली. एका तामिळीने राजीव गांधीची हत्या केली त्याबद्दल कोणी तामिळी किवा शीख यांना दोषी धरत नाही. पण एका ब्राम्हणाने महात्मा गांधींचा वाढ केला तर म्हणून संपूर्ण ब्राम्हण समाजाला टार्गेट का केल जात?? पन्नास वर्ष होऊन सुद्धा अजूनही त्या बाबतीत ब्राम्हनांवर ठपका ठेवला जातो (जेव्हा कि समस्त हिंदू जणांना गांधी वध हि काळाची गरज होती असं वाटत ), हा ब्राम्हण द्वेष नाही का??
 २२. ब्राम्हणांना उठता बसता शिव्या देणाऱ्या माणसांनी हा विचार करावा कि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात बहुसंख्य ब्राम्हण का होते??? का आता तुम्ही राजांपेक्षा जास्त हुशार आहात??

 २३. राजकीय, सामाजिक, अर्थीक, संशोधन, विज्ञान, उद्योग अथवा सरकारी क्षेत्रात ( कुठल्याही प्रकारचे आरक्षण नसताना ) ब्राम्हण यशस्वी का होतात?? हि त्यांची गुणवत्ता आहे,. ब्राम्हणवाद नाही.
 २४. वर्षभरातील दूरदर्शन, वर्तमानपत्र ह्यामधील बातम्या ब्वाच्ल्या असता गुन्हेगारी, बलात्कार, शोषण, दडपशाही, खून करणारे ब्राम्हण अत्यल्प प्रमाणात सापडतात. आणि इतर जेव्हा या गोष्टी करतात तेव्हा ब्राम्हणी कावा, ब्राम्हणी डाव, मनुवादी असं मुलामा देऊन त्या कृत्याला ब्राम्हनांशी जोडतात. लेखाची अथवा बातमीची गरज नसताना ब्राम्हणांना बदनाम केले जाते. यातून यांचे पुरोगामित्व सिद्ध होते काय??? ज्यांना कवील झाली आहे त्यांना सगळे पिवळेच दिसते. तशी कोणतीही घटना घडली कि यांना आधी ब्राम्हण दिसतो.
 या वरील सर्व गोष्टींवरून सिद्ध होते कि ब्राम्हणवाद नाहीच. ब्राम्हणवादाच्या नावाने आरडाओरडा करायचा आणि समाजाला दिश्हीन करायचे. 'हाथी चाले बाजार, कुत्ते भोके हजार' या म्हनिशिवाय यांना दुसरी कोणतीही म्हण लागू पडत नाही.
 आभार,
 श्री. विक्रम एडके.
 ( श्री. विक्रम एडके यांनी वाचण्यासाठी दिलेल्या एका पुस्तकातील वरील उतारा आहे.)

 

देवपूजेची सर्वसाधारण माहिती



देवपूजा झाल्यानंतर करावयाच्या कृती
अ. कर्पूरदीप लावणे : पंचोपचार पूजनामध्ये ‘कर्पूरदीप लावणे’ हा उपचार नसला, तरी कर्पूर हा सात्त्विक असल्याने कर्पूरदीप लावल्याने अधिक सात्त्विकता मिळण्यास साहाय्य होते. यासाठी नैवेद्य दाखवून झाल्यावर कर्पूरदीप लावू शकतो.
आ. शंखनाद करून देवतेची भावपूर्ण आरती करावी.
इ. आरती ग्रहण केल्यानंतर नाकाच्या मुळाशी विभूती लावावी.
ई. तीन वेळा तीर्थ प्राशन करावे. उजव्या हाताच्या पंज्याच्या मध्यभागी तीर्थ घेऊन प्यायल्यावर हाताचे मधले बोट आणि अनामिका यांची टोके हाताच्या तळव्याला लावून ती बोटे दोन्ही डोळ्यांना लावावीत अन् मग ती कपाळावरून डोक्यावर सरळ वरच्या दिशेने फिरवावीत.
उ. शेवटी प्रसाद ग्रहण करावा आणि नंतर हात धुवावेत.

देवाला नैवेद्य अर्पण करण्याची कृती
पद्धत २ - भावाच्या स्तरावरील : देवाला अर्पण करावयाच्या नैवेद्यावर तुळशीच्या दोन पानांनी पाणी प्रोक्षण करून एक पान नैवेद्यावर ठेवावे आणि दुसरे देवाच्या चरणी वहावे. ‘ॐ प्राणाय स्वाहा । ॐ अपानाय स्वाहा । ॐ व्यानाय स्वाहा । ॐ उदानाय स्वाहा । ॐ समानाय स्वाहा । ॐ ब्रह्मणे स्वाहा ।।’, हा पंचप्राणांशी संबंधित मंत्र म्हणत हात जोडून देवाला नैवेद्य समर्पित करावा. त्यानंतर ‘नैवेद्यमध्येपानीयं समर्पयामि ।’, असे म्हणून उजव्या हातावरून ताम्हनात थोडे पाणी सोडावे आणि परत ‘ॐ प्राणाय...’, हा पंचप्राणांशी संबंधित मंत्र म्हणावा. त्यानंतर `नैवेद्यम् समर्पयामि, उत्तरापोशनम्् समर्पयामि, हस्तप्रक्षालनम् समर्पयामि, मुखप्रक्षालनम् समर्पयामि', असे म्हणत उजव्या हातावरून ताम्हनात पाणी सोडावे.
‘आपण अर्पण करत असलेला नैवेद्य देवतेपर्यंत पोहोचत आहे आणि देवता तो ग्रहण करत आहे’, असा भाव नैवेद्य दाखवतांना असावा.
देवाला नैवेद्य अर्पण करण्याची कृती
पद्धत १ - कर्मकांडाच्या स्तरावरील : देवाला अर्पण करावयाच्या नैवेद्यावर तुळशीच्या दोन पानांनी पाणी प्रोक्षण करून एक पान नैवेद्यावर ठेवावे आणि दुसरे देवाच्या चरणी वहावे. त्यानंतर आपल्या डाव्या हाताचा अंगठा डाव्या डोळ्यावर आणि डाव्या हाताची अनामिका उजव्या डोळ्यावर ठेवून डोळे मिटावेत आणि ‘ॐ प्राणाय स्वाहा । ॐ अपानाय स्वाहा । ॐ व्यानाय स्वाहा । ॐ उदानायस्वाहा । ॐ समानाय स्वाहा । ॐ ब्रह्मणे स्वाहा ।।’, हा पंचप्राणांशी संबंधित मंत्र म्हणत उजव्या हाताच्या पाचही बोटांच्या टोकाने नैवेद्याचा वास देवाकडे न्यावा.

देवतेला नैवेद्य दाखवणे

अ. नैवेद्यासाठीचे पदार्थ बनवतांना तिखट, मीठ आणि तेल यांचा वापर अल्प करावा अन् तुपासारख्या सात्त्विक पदार्थांचा वापर अधिक करावा.
आ. नैवेद्य दाखवण्यासाठी केळीचे पान घ्यावे.
इ. नैवेद्यासाठी सिद्ध केलेल्या पानात मीठ वाढू नये.
ई. देवाला नैवेद्य दाखवण्यापूर्वी ते अन्न झाकून ठेवावे.
उ. नैवेद्य दाखवतांना प्रथम इष्टदेवतेला प्रार्थना करून देवासमोर भूमीवर पाण्याने चौकोनी मंडल करावे आणि त्यावर नैवेद्याचे पान (किंवा ताट) ठेवावे. नैवेद्याचे पान ठेवतांना पानाचे देठ देवाकडे आणि अग्र आपल्याकडे करावे.
ऊ. नैवेद्य दाखवतांना ताटाभोवती एकदाच घड्याळाच्या काट्याच्या दिशेने पाणी फिरवावे. (पाण्याचे मंडल काढावे.) परत उलट्या दिशेने पाणी फिरवू नये. (संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘धर्म असे का सांगतो ?’ या ग्रंथमालिकेतील भाग ३ ‘पंचोपचार आणि षोडशोपचार पूजनामागील शास्त्र)
देवतेला दीप ओवाळणे
अ. देवाला निरांजनाने घड्याळाच्या काट्याच्या दिशेने तीन वेळा सावकाश ओवाळावे. याच वेळी डाव्या हाताने घंटी वाजवावी.
आ. दीप लावण्याच्या संदर्भात हे लक्षात घ्या !
१. दीप प्रज्वलित करतांना एका दिव्याने दुसरा दिवा लावू नये.
२. तेलाच्या दिव्याने तुपाचा दिवा लावू नये.
३. देवघरातील तेलाच्या दिव्याची वात प्रतिदिन पालटावी.
देवतेला धूप दाखवणे (किंवा उदबत्तीने ओवाळणे)

अ. देवाला धूप दाखवतांना तो हाताने पसरवू नये.
आ. धुपानंतर त्या त्या देवतेचे तत्त्व जास्त प्रमाणात आकृष्ट करून घेऊ शकतील अशा गंधांच्या उदबत्त्यांनी त्या त्या देवतेला ओवाळावे, उदा. शिवाला हीना आणि श्री लक्ष्मीदेवीला गुलाब.
इ. देवतेला ओवाळायच्या उदबत्त्यांची संख्या : सर्वसाधारणतः प्राथमिक अवस्थेतील शक्ती-उपासकाने पाच, कर्तव्य म्हणून पूजा वगैरे करणार्‍याने दोन आणि भक्तीभावाने उपासना करणार्‍या साधकाने एका उदबत्तीने देवतेला तीन वेळा ओवाळावे.
ई. धूप दाखवतांना तसेच उदबत्तीने ओवाळतांना डाव्या हाताने घंटी वाजवावी. (संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘धर्म असे का सांगतो ?’ या ग्रंथमालिकेतील भाग ३ ‘पंचोपचार आणि षोडशोपचार पूजनामागील शास्त्र ’)

देवपूजा करतांना भाव कसा ठेवावा ?
अ. प्रभू श्रीरामाच्या भक्तांपैकी हनुमान हा सर्वश्रेष्ठ भक्त म्हणून ओळखला जातो, तो त्याच्या दास्यभक्तीमुळे. दास्यभक्ती आपल्यात निर्माण होण्यासाठी श्रद्धायुक्त अंतःकरणाने शरणागत होऊन देवतेची पूजा करावी.
 आ. आपल्या हृदयातील हरीची यथासांग पूजा करावी. आपल्या अंतःकरणात ज्या श्रीरामाची आपण पूजा केली,
त्या ईश्वराचे प्रतिबिंब त्या मूर्तीत आहे, असे ध्यान करावे.
श्रीरामप्रभूच्या मूर्तीची पूजा करतांना आपण राममय आहोत, असे अखंड ध्यान करावे.’ - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
कर्मकांडाच्या स्तरावरील देवपूजा

देवतेला पत्री आणि फुले वहाणे
देवघरातील देवतांना फुले वहातांना आपल्या उपास्यदेवतेचे नाम घेऊन ताटातील छोट्या परंतु भडक रंगाच्या फुलाने आरंभ करून त्यानंतर मध्यम परंतु फिकट रंगाच्या फुलाकडे जाऊन त्यानंतर सर्वांत शेवटी मोठ्या आकाराच्या पांढर्‍या फुलाकडे जावे. देवतांच्या क्रमामध्ये शंकूच्या मध्यबिंदूशी ठेवलेल्या श्री गणेशाच्या मूर्तीला / चित्राला फूल वाहून मगच पुढच्या म्हणजे द्वितीय स्तराला प्रथम पुरुष मुख्य देव आणि त्याला समांतर स्त्रीशक्ती देवता किंवा त्या देवाची उपरूपे यांना फुले वहावीत.

पंचोपचार पूजनाची कृती कर्मकांडाच्या स्तरावरील देवपूजा

देवतेला गंध (चंदन) आणि हळदी-कुंकू वहाणे
प्रथम देवतेला अनामिकेने (करंगळीच्या बाजूच्या बोटाने) गंध लावावे. त्यानंतर हळदी-कुंकू वहातांना आधी हळद आणि नंतर कुंकू उजव्या हाताचा अंगठा अन् अनामिका यांच्या चिमटीत घेऊन देवतेच्या चरणांवर वहावे.
कर्मकांडाच्या स्तरावरील देवपूजा

देवतेला पत्री आणि फुले वहाणे
अ. देवाला कागदी, प्लास्टिकची यांसारखी खोटी, तसेच शोभेची फुले वाहू नयेत, तर ताजी आणि सात्त्विक फुले वहावीत.
आ. देवाला वहावयाची फुले आणि पत्री यांचा गंध घेऊ नये.
इ. देवतेला फुले वहाण्याच्या पूर्वी पत्री वहावी.
ई. त्या त्या देवतेचे तत्त्व अधिक प्रमाणात आकृष्ट करणारी पत्री आणि फुले त्या त्या देवतेला वहावीत, उदा. शिवाला बेल आणि श्री गणेशाला दूर्वा अन् लाल फूल. श्री गणपतीला दूर्वा वहातांना मुख सोडून श्री गणपतीची संपूर्ण मूर्ती दूर्वांनी मढवून टाकतात. दिवसातून तीन वेळा दूर्वा पालटतात. त्यासाठी दिवसात तीन वेळा पूजा करतात.

देवपूजा करतांना भाव कसा ठेवावा ?

अ. देवता तत्त्वरूपी असली, तरी तिची पूजा ही मूर्ती किंवा चित्र यांच्या रूपात, म्हणजे स्थूलरूपात करतात. ‘पूजास्थळी देवतेची मूर्ती किंवा चित्र नसून साक्षात देवताच आहे’, असा भाव ठेवून पूजा केल्यास ती देवतेच्या चरणांशी लवकर पोहोचते. यासंदर्भात आमचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांचा त्यांचे गुरु श्री अनंतानंद साईश यांच्याप्रती भाव कसा होता, ते पुढील प्रसंगावरून लक्षात येईल.
एकदा प.पू. भक्तराज महाराज यांनी आश्रमातील, रस्त्याला लागून असलेल्या देवघरात पूजेत असलेले त्यांच्या गुरूंचे छायाचित्र आश्रमाच्या नवीन वास्तूतील सभागृहामध्ये नेऊन ठेवायला सांगितले. तेव्हा ‘‘ते डोक्यावर ठेवून वाजतगाजत न्या’’, असे सांगितले. प्रत्यक्ष गुरूंना जसे आदराने एका खोलीतून दुसर्‍या खोलीत नेले असते, तसे छायाचित्राला न्यायला सांगितले; कारण त्यांच्या भावानुसार ते नुसते छायाचित्र नसून प्रत्यक्ष गुरुच होते.

देवपूजा कोणी करावी ?

अ. नेहमीची देवपूजा : देवपूजा अमुक एका व्यक्तीनेच करावी, असा नियम जरी नसला तरी सर्वसाधारणतः कुटुंबातील वडीलधार्‍या पुरुषाने देवपूजा करावी. घरात पुरुष नसेल, तर घरातील वडीलधार्‍या स्त्रीने पूजा करावी.
स्त्रीने पूजा करतांना ती नाममंत्राने करावी. एका व्यक्तीने पूजा केल्यानंतर दुसर्‍या व्यक्तीने पुन्हा पूजा करू नये. देवाची पूजा झाल्यानंतर घरातील सर्वांनी शक्य असल्यास देवांना फुले वहावीत व नमस्कार करावा. आरतीच्या वेळी शक्यतो सर्वांनी उपस्थित राहून एका सुरात व भावपूर्ण रीतीने आरती म्हणावी. असे शक्य नसल्यास एकाने आरती म्हणावी व इतरांनी टाळ्या वाजवाव्यात.

देवपूजा कोणत्या दिशेला करावी ?

पूर्व दिशेला विशेष महत्त्व असून त्या दिशेला तोंड करून पूजाविधी करण्यास सांगितले आहे; म्हणूनच देवघर नेहमी पूर्व-पश्चिम दिशेने असणे योग्य असते.
(याविषयी अधिक माहिती सनातनचा लघुग्रंथ ‘देवघर व पूजेतील उपकरणे (शास्त्रीय महत्त्व व मांडणी)' यात दिली आहे.

देवपूजा कधी करू नये ?

अ. पारोश्याने (आंघोळ न करता) व व्यसनी अवस्थेत
आ. सोयर व सुतक लागल्यापासून दहा दिवस (सोयर व सुतक लागल्यानंतर दहा दिवस अशौच असते. अकराव्या दिवशी शुद्धी करून पूजा करता येते. सुतक असतांना कर्त्याला मात्र १२ व्या दिवसानंतरच पूजा करता येते.)
इ. घरातील स्त्री रजःस्वला असल्यास व तिचा वावर नसलेल्या खोलीत देव असतील, तर घरातील वडीलधार्‍या पुरुषाने आंघोळ करून पूजा करावी. जागेच्या अभावी देव वेगळ्या खोलीत ठेवणे शक्य नसल्यास चार दिवस (स्त्रीचा रजोकाळ समाप्त होईपर्यंत)
देवघर पडद्याने झाकून ठेवावे. विशिष्ट कारणासाठी अशा प्रकारे देवाला झाकून ठेवणे गैर नाही. वैष्णव सांप्रदायिकांच्या मंदिरांमध्येही ‘देव स्नान करत आहे, देव निजला आहे’ वगैरे कारणांसाठी देवाची मूर्ती पडद्याने झाकून ठेवण्याची पद्धत आहे. हे एकप्रकारे देवासाठी निराळी खोली बनवण्यासारखेच झाले.

देवपूजा दिवसात किती वेळा आणि कोणत्या समयी करावी ?

देवपूजा हे नित्य कर्म आहे. प्रतिदिन त्रिकाल (प्रातःकाली, माध्यान्ही म्हणजे दुपारी आणि सूर्यास्तानंतर) षोडशोपचारे (सोळा उपचारांनी) पूजा करावी;
परंतु त्रिकाल अशी पूजा करणे शक्य नसल्यास सकाळी षोडशोपचारे पूजा करावी आणि दुपारी व सूर्यास्तानंतर पंचोपचार (पाच उपचारांनी) पूजा करावी. त्रिकाल पूजा करणे शक्य नसल्यास किमान सकाळी एकदा तरी पूजा करावी. षोडशोपचार आणि पंचोपचार पूजा करणे अशक्य असेल, तर गंध अन् पुष्प या दोन उपचारांनी तरी पूजा करावी. धर्मशास्त्रात अशा प्रकारे पर्याय सांगितले आहेत; कारण कोणत्याही परिस्थितीत उपासकाकडून देवपूजा घडावी, हा त्यामागील उद्देश आहे !

देवपूजेची सर्वसाधारण माहिती देवपूजेचे प्रकार !
धर्मशास्त्रात देवपूजा करण्याचे पुढील प्रकार सांगितले आहेत. पहिले दोन प्रकार हे सर्वसाधारणतः ज्याला आपण ‘देवपूजा’ म्हणतो अशा स्थूल स्तरावरील आहेत, तर त्यापुढील दोन प्रकार हे सूक्ष्म स्तरावरील आहेत.
अ. पंचोपचार पूजा (मूर्ती किंवा चित्र यांची पूजा) : गंध, फूल, धूप, दीप आणि नैवेद्य हे पाच उपचार देवाला समर्पित करणे
आ. षोडशोपचार पूजा (मूर्ती किंवा चित्र यांची पूजा) : वरील पंचोपचारांसहित सोळा उपचारांचा समावेश यात होतो.
इ. मानसपूजा : मनाने सगुण मूर्ती कल्पून मनाने तिची पूजा करणे
ई. परापूजा : निर्गुण परब्रह्माची परावाणीतून पूजा करणे

September 11, 2011

Aarathi Anantachi


अनंताची आरती

(Arati Anantachi)

जय श्री अनंता लक्ष्मीकांता आरती ओवाळू ।
भक्तां संकट पडतां धावे अनंत कनवाळू ।। धृ।।
भाद्रपद मासी शुक्ल चतुर्दशी तव व्रत नेमाने ।
दुकूलदोरक करुनि पूजिती अनंत नामानें ।।1।।
नानापरिची पुष्पें द्रव्ये तुजला अर्पीती ।
षोडशपूजा करूनि ब्राह्मण संतर्पण करिती ।।2।।
अपूप वायन दंपतिपूजन त्या दिवशी करिती ।
अनंत संतुष्टोनि देती संतति संपत्ती ।।3।।
रामा धर्मा आचरिता व्रत क्लेशांतुनि सुटला ।
कौंडिण्याने पुजिता तुजला उद्धरिले त्याला ।।4।।
मोरेश्वरसुत वासुदेव हा तिष्ठत सेवेसी ।
संकटकाळी रक्षी अनंता अपुल्या दासासी ।।5।।

September 10, 2011

Anant Charthurdhashi

Anant Chathurdashi

Anant Chaturdashi is Ganesh festival’s last day. On this day the idol of Ganapati is immersed in river, lake or sea which is also known as Ganapati Visarjan.
This festival is celebrated mainly in Maharastra. We all believed that by doing this Lord Ganesh will bless them with prosperity, happiness and wealth while leaving the house and will take away all their sorrows and miseries. Almost an Anant Chaturdashi is the last day of the “Ganesh festival” celebrated in Maharashtra.



Story of 'Anant'

Hindu Mythology tells that, there was a Brahmin named Sumant. From his wife Diksha he had a daughter named Sushila. After the death of Diksha, Sumant married Karkash who was not caring to Sushila. She gave a lot of trouble to her. Sushila married to Kaundinya and decided to leave the house to avoid the nuisance of her step mother. On the way, Kaundinya went to a river to take bath and Sushila joined a women group who were worshipping “Anant”. Sushila was very curious to know the reason of worshipping. The women explained her, the purpose of this vow to obtain divinity and wealth, and are kept for 14 years. Sushila decided to take the “Anant Vow” and slowly they became very rich. One day Kaundinya, noticed a string (Anant string) on Sushila's left hand. This string is usually tied on the left hand by women to observe the vow. When Kaundinya heard the story of the Anant vow, he was displeased and said that they had become rich, not for Anant but for his knowledge and efforts. He then took the Anant String from Sushila’s hand and threw it into the fire. Soon after this incident, they were reduced to extreme poverty. Kaundinya realized the effect of the Anant and hence decided to undergo rigorous penance until the appearance of the God himself. He went into the forest. There, he saw tree full of mangoes but was covered with worms. He asked the tree if he had seen Anant but he got a negative reply. Then he asked lakes, cow, donkey, elephant but nobody could respond him positively. At last he prepared a rope to hang himself. But suddenly Anant appeared in the form of an old Brahmin and advised Kaundinya that if he made the 14 years vow, he would get back all his wealth and happiness. Lord Anant also explained the incidents occurred during the course of his way to meet him.

September 08, 2011

Ganpati Festival Vacation in Konkan


Ganpati Festival is much vibrant and reflect a spectrum of colors; vigorous celebrations that almost puts everyone in trance; unique customs and practices that reveal the much unique culture and traditions; a singular event, a singular celebration, a singular platform that puts over one billion people on common grounds.
Whatever your experiences be, there is always something more to be had. Do you wish to have an active participation in this much celebrated festival?

One more reason you would rather prefer for a Ganpati Festival vacation, in Konkan, is that the delectable dishes prepared on this occasion. Does your heart beat with this, crave to see and witness all this?